देवगड येथे एसटी बस व ट्रक यांचा अपघात ,चालक जखमी

देवगड(प्रतिनिधी)
शिरगाव हून  देवगडच्या दिशेने येणारी तरळे देवगड (गाडी क्रमांक एम एच .१४ बिटी १७०० आणि देवगडहून धान्य उतरवून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक( एम.एच.०७ एक्स ०५७६ )यांची जामसंडे कट्टा येथील तीव्र वळणावर एकमेकांना धडक होऊन या अपघातात एसटी चालक ज्ञानेश्र्वर शंकर जायभाये यांच्या  पोटाला व पायाला दुखापत झाली . त्यांना लागलीच देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी देवगड मधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या अपघातात एसटीचे समोरील काच व दर्शनी सुमारे ६० हजार रूपये एवढे नुकसान झाले असुन ट्रक चे नुकसान झाले. सदरची घटना दुपारी १.३० च्या सुमारास घडली. सुदैवाने एसटी बस मधून कोणीही प्रवासी प्रवास करीत नव्हते वाहक रामदास विश्वनाथ केंद्रे हे सेवा बजावीत होते.तर ट्रक चालक यशवंत मुकुंद
म्हाडगूत होते .अपघाताचे वृत्त समजताच  समजताच सहा. वाहतूक अधिक्षक श्रीकांत सैतवडेकर सहा. वाहतूक निरीक्षक गंगाराम गोरे तसेच देवगड पोलीस स्थानकाचे सहा. पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे ,पोलीस हवालदार योगेश लगड,पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र महाले यांनी धाव घेतली.व पुढील कार्यवाही सुरू केली.
सायंकाळी उशिरापर्यंत रीतसर फिर्याद गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.