गोवा दारू पकडली,गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी)देवगड व आजूबाजूच्या अवैध धंद्याविरोधात देवगड पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली असुन तालुक्यातील मशवी येथील एका घरातून गैरकायदा ,बिगर परवाना बाळगलेल्या गोवा मद्याचा १,७४,३२०/-रु एवढ्या किमतीचा मद्यसाठा मुद्देमाल जप्त केला आहे.ही घटना सोमवारी दुपारी मशवी वाडी येथे घडली या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे यांनी रीतसर फिर्याद दाखल केली आहे.मशवी वाडी येथील घरात अवैध गोवा बनावटीचा साठा बिगर परवाना बाळगलेल्या स्थितीत असल्याची माहिती देवगड पोलिसांना मिळताच देवगड पोलिसांनी घटनास्थळी जात शिताफीने छापा टाकला व अवैध मद्यसाठा ताब्यात घेतला.जप्त केलेल्या मुद्देमाल मध्ये बोब्ज लेमन व्होडका १८० मिली १२०० बाटल्या अंदाजे ९६,००० हजार रु किमतीच्या, हनीब्लेड प्युअर ब्रॅण्डिं,१८० मिली ६४०बाटल्या ,मॅक्डोल न.१ च्या १४४ बाटल्या,१४,४००/-रु डॉक्टर ब्रॅण्डिं ४८बाटल्या रु ९२००/-किमतीचा, डीएसपी ब्लॅक ४८ बाटल्या रु ४८००/-असा एकूण २१०८ बाटल्या ४४बॉक्स अंदाजे किंमत १,७४,३२०/किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक भरत धुमाळ,यांचे मार्गदर्शनाखाली,सहा.पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे,पोलीस हवालदार आशिष कदम,प्रवीण सावंत,पोलिस कॉन्स्टबल स्वप्नील ठोंबरे या पथकाने ही कारवाई केली .

या घटनेतील दोन संशयित आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई)नुसार कारवाई करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत