दहा कोटी वृक्ष लागवडीनंतर रोपांच्या पिशव्या संकलित करून संस्थेकडे पाठवाव्यात निवेदिता प्रतिष्ठानचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दापोली | प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित आच्छादन वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वकांक्षी अशी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली आहे .

यालाच अनुसरून वृक्ष लागवड करताना प्लास्टीक कचरा होऊ नये आणि प्रत्येकाच्या हाताला घनकचरा संकलनाची सवय लागावी व जमिनीचे प्रदूषण होऊ नये अशा उद्देशाने निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे, की सदर वृक्ष लागवडीनंतर ज्या प्लास्टीकच्या पिशव्या शिल्लक राहतात आणि आजपर्यंतच्या अनुभवानुसार त्या तेथेच कुठेतरी बांधावर किंवा कोपऱ्यात टाकल्या जातात आणि त्यामुळे जमिनीचे आणि पाण्याचे प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी होणारा प्लास्टीक
कचरा टाळण्यासाठी कृतीत्मक धोरण आखणे अत्यावश्यक आहे.
याकरिता खालील प्रकारे उपाययोजना निवेदिता प्रतिष्ठान तर्फे मुखमंत्री यांना सुचविण्यात आल्या आहेत.

दहा कोटी वृक्ष लागवडीनंतर पिशव्या कशा परत आणाव्या
ज्या पद्धतीने रोपांचे वाटप केले जाईल उदाहरणार्थ जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा पद्धतीने हे जे वाटप करण्याची पद्धत आतापर्यंतची आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक स्वराज्य संस्था ,तालुका, जिल्हा ,विभाग यांना आपापल्या ठिकाणी लागवड झालेल्या रिकाम्या प्लास्टिकच्या पिशव्या स्वच्छ धुतलेल्या स्थितीत जमा करण्यात सांगण्यात याव्यात .
सदर सर्व दहा कोटी प्लास्टिकच्या फाटलेल्या पण धुतलेल्या रिकाम्या पिशव्या निवेदिता प्रतिष्ठान दापोलीकडे पाठवून द्याव्यात; त्या पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल.
असे केले तर आज वृक्ष लागवड करताना दहा कोटी पिशव्यांचा कचरा हा पृथ्वीवर पडताना वाचणार असून नागरिकांना स्वच्छतेचा आणि कचरा न करण्याचा या माध्यमातून एक उत्तम असा संदेश जाऊ शकेल .
याकरता आपणाला विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने दहा कोटी वृक्ष लागवडीचे आवाहन केले आहे त्या पद्धतीनेच सदर वृक्ष लागवडीनंतर दहा कोटी पिशव्या जमा करण्याचे संकलन करण्याचे आणि एकत्रित रित्या निवेदिता प्रतिष्ठानकडे पाठवण्याची सूचना देऊन महाराष्ट्राला प्लास्टिक कचरामुक्त करण्याकरता प्रवृत्त करावे आणि जमीन प्रदूषण टाळण्यास सहकार्य करावे ही विनंती.
रोपांच्या रिकाम्या धुतलेल्या पिशव्या संस्थेच्या पुढील पत्त्यावर पाठवाव्यात निवेदिता प्रतिष्ठान.
कचरा संकलन केंद्र.अपना स्वीट्स जालगाव ची इमारत.(दापोली दाभोळ मुख्य मार्ग)मु. जालगाव. ता. दापोली.जिल्हा रत्नागिरी.415712 अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत परांजपे यांनी मुखमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.