लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने गुणगौरव समारंभ संपन्न

इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये ७५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने आयोजित समाजातील दहावी व बारावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी २२ जुन रोजी दुपारी शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय, लांजा येथे पार पडला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष सुभाष राणे यांनी भूषविले होते.यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष शरद चव्हाण,उपाध्यक्ष समीर सावंत, उपाध्यक्ष संजय यादव, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव,लांजा हायस्कूल माजी मुख्याध्यापक रमाकांत सावंत हे मान्यवर उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मराठा समाजातील दहावी व बारावी परिक्षेत ७५ टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक गुण मिळवणार्या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या तसेच पदविका धारक विद्यार्थ्यांचा अध्यक्ष सुभाष राणे व अन्य मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.
यानंतर संस्थेचे सरचिटणीस विजय पाटोळे, सल्लागार नंदकुमार पाटोळे, कोंडगे हायस्कूल शिक्षक अनिल कदम , तिलोत्तमा खानविलकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील मराठा समाजातील विद्यार्थी, पालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस विजय पाटोळे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष संजय यादव यांनी मानले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुभाष राणे, उपाध्यक्ष शरद चव्हाण, समीर सावंत, संजय यादव, सरचिटणीस विजय पाटोळे , प्रकाश जाधव कोषाध्यक्ष, प्रजाप माने सहचिटणीस, प्रकाश सावंत, प्रमोद जाधव, स्वप्ना सावंत, तिलोत्तमा खानविलकर, स्मिता दळवी सदस्य, नंदकुमार पाटोळे सल्लागार यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला अनंत उर्फ बापू जाधव, विजय जाधव, रविंद्र दळवी , किशोर यादव, अनुराधा राणे, नेहा पाटोळे व मराठा समाज बंधू,भगिनी तसेच तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट – लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात राज्याचे मस्त्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्ताने केक कापण्यात आला.