तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मंदार चोरगे प्रथम : साक्षी भोसले द्वितीय, 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

वैभववाडी भाजपाच्या वतीने स्पर्धा संपन्न

वैभववाडी l प्रतिनिधी :       पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी निमित्त वैभववाडी भाजपाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत श्री. मंदार चोरगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर साक्षी प्रवीण भोसले हीने द्वितीय क्रमांक पटकावला.

      एडगाव – वायंबोशी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवन उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. श्री. मंदार सदाशिव चोरगे व साक्षी प्रविण भोसले यांना नामदार नितेश राणे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे माजी सभापती जयेंद्र रावराणे, व पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.