चिपळूण : भारतीय जनता पार्टी चिपळूण वतीने मोदी @ ११ आणि जागतिक योग दिनानिमित्त काही मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच हे सत्कार नमो सन्मान म्हणून गौरवण्यात आले.
यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई चव्हाण माजी नगराध्यक्ष सुरेखाताई खराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, माजी मंडल शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी युवक अध्यक्ष संदीप भिसे, महिला सरचिटणीस श्रद्धा ताई कदम, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी एकनाथ सहस्रबुद्धे व विनोद सुर्वे यांनी योग दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला ज्येष्ठ पदाधिकारी विनोद कदम, शहर उपाध्यक्ष महेश कांबळे,विवेक गोखले, प्रफुल पिसे, अमय सुर्वे, प्रणय वाडकर, दर्शन चव्हाण, सुधीर पानकर, सपना भिसे, वेद सुर्वे, सुभाष कळवटे आदी मान्यवर उपस्थित होते.










