कुणबी युवा मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष कांबळे तर सरचिटणीसपदी सचिन रामाणे यांची निवड

चिपळूण (वार्ताहर) : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई सलग्न कुणबी युवा मंडळ यांची सन २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी व पदाधिकारी निवड रविवार दि. २२ जून रोजी, कुणबी ज्ञाती गृह, (वाघे हॉल) परेल मुंबई येथे संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये युवाध्यक्ष पदी संतोष कांबळे तर सरचिटणीस पदी सचिन रामाणे यांची निवड करण्यात आली.
संघ सरचिटणीस कृष्णा वणे यांनी सभेला सुरुवात करून दिली. कोकण विभागात कुणबी संघाच्या ४२ पेक्षा जास्त तालुका शाखा आहेत. या शाखांमधून युवा प्रतिनिधी उपस्थित राहून निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये कुणबी युवा मंडळ कार्यकारिणी सन 2024-25 ते 2029 साठी पुढील प्रमाणे निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदी संतोष कांबळे (गुहागर), उपाध्यक्ष मिलिंद चिबडे (महाड पोलादपूर), उपाध्यक्ष प्रतिक मिसाळ (खेड), उपाध्यक्ष ॲड महेश आंबवले (तळा), उपाध्यक्ष पुनित खांडेकर (ठाणे शहर), सरचिटणीस पदी सचिन रामाणे ( संगमेश्वर), सह चिटणीस पंकज पालकर (माणगाव), नितिन भुवड (मुरुड-जंजिरा), अविनाश आग्रे (लांजा), बारकू बेंडल(चिपळूण), खजिनदार पदी पांडुरंग दोडेकर (रोहा) यांची निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित मध्यवर्ती कुणबी युवा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य यांचे संघ आणि कुणबी युवा मुंबई यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.