रत्नागिरी :
मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी खेड तालुक्यातील जगबुडी नदी ही दुपारी बाराच्या आसपास इशारा पातळीच्या वर वाहत होती.
याबाबतची माहिती रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूर नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली. त्यानुसार नदी पातळी अहवालामध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदी ही 5.40 मीटर या पातळीवरून वाहत होती. जगबुडीची इशारा पातळी 5 मीटर तर धोका पातळी ही 7 मीटर इतकी आहे.

जिल्ह्यातील अन्य वाशिष्टी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी, आणि बावनदी या नद्या मात्र नियमित पातळीवरून वाहत होत्या.











