वेंगुर्ले l प्रतिनिधी :राय.डॉ. रा.धों.खानोलकर हायस्कूल मठचा विद्यार्थी कु. काशिनाथ संतोष तेंडोलकर याची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मठ हायस्कुल मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, नूतन मराठा हितवर्धक संघ मुंबई आणि माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांचेकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा क्रीडा संकुल ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा १४ वर्षे वयोगट मुलगे या गटातून राय.डॉ. रा.धों. खानोलकर हायस्कूल मठचा कु. काशिनाथ संतोष तेंडोलकर याने चौथे स्थान प्राप्त केल्याने त्याची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत त्याने पहिल्या फेरीपाससूनच आपली विजयी पताका उंचावत ठेवली होती. प्रत्येक सामाना जिंकत आणि काही फेऱ्यांमध्ये सामने बरोबरीत ठेवूनही त्याने निवड प्रक्रियेत आपले स्थान टिकवून ठेवले. आणि अखेरीस चौथा क्रंमांक मिळवीत त्याने विभागीय स्पर्धा प्रवेश मिळावीला. त्याच्या या उत्कृष्ठ कामागिरी बद्दल मठ हायस्कुलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, नूतन मराठा हितवर्धक संघ मुंबई व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांचेकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. ए. जाधव यांनी त्याचे कौतुक करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












