मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा स्तुत्य उपक्रम

गुहागर l प्रतिनिधी :गुहागर तालुक्यात गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी दहा हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने गुहागर विधानसभा क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असतात .गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून नेहमीच मदतीचा हात पुढे असतो. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्ष लागवड, यूपीएससी एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, छत्री वाटप आदी विविध उपक्रम ते प्रतिवर्षी राबवत आहेत .यावेळी मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा हजार वह्या वाटपाचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर बोलताना म्हणाले की जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकही कमी आहेत मराठी व इंग्रजी या दोन भाषा अनिवार्य असून आता इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शक्तीची केली जात आहे हे योग्य नाही आज दुर्गम भागामध्ये शाळेच्या इमारतींची दुरवस्था होत आहे व इमारतींची मोडकळीच आल्या आहेत आहे नवीन शैक्षणिक धोरणामुळे हिंदी सक्तीला राजसाहेब ठाकरे यांनी प्रकटविरोध दर्शवला असून शाळांमध्ये हिंदी भाषा शक्तीचा करण्याचा निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की विरोध करेल तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक यांच्यासह अनेक राष्ट्रात हिंदीची सक्ती का केली जात नाही मग महाराष्ट्रातच ही शक्ती का केली जाते त्याचे उत्तरही राज्य शासनाने दिले पाहिजे तसेच गुहागर तालुक्यातील अंगणवाडी शाळेमध्ये लाईटची व्यवस्था नाही काही शाळा भाडेतत्त्वावर आहेत येथे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे

गुहागर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप सुरू आहे. या शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर संहसंपर्क अध्यक्ष समिर जोयशी, जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर, व्यवस्थापन समिती शाळा नं १ अध्यक्ष संदिप कोडविलकर, शिक्षण तज्ञ श्रीराम देवस्थळी, जानवळे शाळा नंबर १मुख्याध्यापक कैलास शार्दुल व्यवस्थापन समिती शाळा नं२ अध्यक्ष सुदिप तुपते

उपतालुका अमित खांडेकर, विभाग अध्यक्ष तुशार शिरकर ,उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोदार ,जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर, जानवळे शाळा नं २ मुख्याध्यापक सविता देशमुख,सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, जानवळे शाळा नं ३ मुख्याध्यापक अविनाश गोरड , शिक्षक सचिन कांबळे, चंद्रकांत बेलेकर, सोनाली भालेकर, ममता विचारे, स्वरुपा घोरपडे, दर्शना समगीसकर, राकेश गजबे, प्रयोगशाळा शिक्षक (फीरती) रवी खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश लांजेकर ,सोपनिल कोंलबेकर,सतोश हेगिष्टे आशा सेविका अमुता जानवळकर, विजया शिंदे, अंगणवाडी सेविका श्रद्धा बेलवलकर, अनुष्का चिपळूणकर, सुप्रिया संसारे, गटप्रवक्त्या संकीता म्हसकर, शाळांतील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.