भाजपा नेते,मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गटप्रमाणे करण्यात आले वृक्षारोपण

रत्नागिरी : वृक्षारोपणाचे बहुआयामी फायदे ओळखून येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठी झाडे लावण्यात आणि त्यांचे संगोपन करण्यात सरकार,विविध संस्था आणि व्यक्ती या सर्वांची महत्वाची भूमिका आहे. एकत्रितपणे आपल्याला झाडांच्या शक्तीचा वापर करून एक चांगले,समाजिकदृष्टया चैतन्यशील,आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि पर्यावरणीयदृष्ट्या लवचिक जीवन जगता येईल.

या सर्वांचा विचार करून सामाजिक बांधिलकी ठेऊन भाजपा नेते,महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.नितेशजी राणे यांच्या सोमवार दि.२३ जून २०२५ रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री राजेश सावंत, रत्नागिरी उत्तर तालुकाध्यक्ष श्री विवेक सुर्वे,रत्नागिरी मध्य तालुकाध्यक्ष श्री.प्रतिक देसाई,रत्नागिरी दक्षिण तालुकाध्यक्ष श्री दादा दळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा चिटणीस श्री अशोक वाडेकर यांच्या मोलाच्या सहकार्यातून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गटप्रमाणे जि.प शाळा व ग्रामस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस श्री सतेज नलावडे,उपाध्यक्ष श्री बावा नाचणकर,श्री भाई जठार,श्री नंदू चव्हाण,मिरजोळे ग्रामपंचायत माजी सदस्य सौ.सुचिता नाचणकर,श्री प्रशांत पांचाळ,श्री अनिल पावसकर, श्री दिपक मोरे,श्री अविनाश आडविलकर,श्री निलेश गराटे,सौ आस्था गराटे,श्री आशिष धुंदूर,श्री प्रशांत सनगरे,श्री सागर सनगरे,श्री बंटी पांचाळ,श्री समीर भोसले,श्री मयुरेश ठोंबरे,श्री विजय मांडवकर,श्री किरण चव्हाण तसेच जिल्हा परिषद शाळा मिरजोळेच्या मुख्याध्यापिका सौ जुई पाटणकर,उप शिक्षक श्री राजेंद्र वरवडेकर,सौ मंजुळा बिरादार,श्री सुनीता पालवकर आदी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते