जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत राजर्षी शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

गावखडी / वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभीस राजर्षी शाहूमहाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार शालेय स्वराज्य मंत्रीमंडळाची मुख्यमंत्री कु.मैत्रेयी अभ्यंकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, शिक्षिका ऐश्वर्या गुरव, शालेय मुख्यमंत्री मैत्रेयी अभ्यंकर, उपमुख्यमंत्री रचित म्हादये आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर आणि उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर आदि शिक्षकांनी राजर्षी शाहूमहाराज जयंतीनिमित्त शाहूमहाराज यांच्या जीवनातील प्रसंग कथाकथन केले त्यानंतर राजर्षी शाहूमहाराज जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली . तसेच विद्यार्थ्यांची “थोर समाजसेवक राजर्षी शाहूमहाराज ” या विषयावर निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, संजया पावसकर, ऐश्वर्या गुरव आदिंनी बहुमोल परिश्रम घेतले.
उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.