चिपळूण (प्रतिनिधी) : दिवाळीच्या निमित्ताने हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने चिपळूण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सनातन सात्विक उत्पादनाचे भेट संच आणि सनातन पंचाग देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. दिवाळीतही कौटुंबिक सुखांपेक्षा अथकपणे जनसेवा आणि कायदा सुव्यवस्था राखून नागरिकांना उत्सव उत्साहात साजरा करण्याची सेवा देत आहेत. याबद्दल पोलिस दलाचे कौतुक नागरिकांनी करणे या कर्तव्य भावनेने हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना या शुभेच्छा दिल्या गेल्या. यावेळी भाजपचे अनुराग उतेकर, खोपडचे सरपंच महेश शिर्के, माजी सैनिक संघटनेचे प्रकाश पालांडे, प्रशांत उतेकर, गोरक्षक विक्रम जोशी, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत चाळके उपस्थित होते.













