गौरव पोंक्षे l माखजन : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शाहू महाराजांनी संपन्न महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले.खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ शिक्षक प्रा संजय सूर्यवंशी यांनी केले.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वत्र वणवा पेटलेला असताना,सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असताना शाहू महाराजांनी अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न केला.समाज व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला.अनेक लोक कलांना राजाश्रय दिला.असे नमूद केले.
यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करताना संतोष कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना हा दिन साजरा करण्याचा महत्व सांगितले.
दरम्यान यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,सौ मानसी कोवळे,संतोष कुलकर्णी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव परब यांनी केले.











