सर्वानुमते निवड : फेडरेशनची कार्यकारणी जाहीर होणार
मालवण | प्रतिनिधी : गाबीत फिशरमेन फेडरेशन अध्यक्षपदी विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे.गाबीत फिशरमेन फेडरेशन सभा मालवण येथील हॉटेल श्री महाराज येथे मंगळवारी संपन्न झाली. गाबीत मच्छिमार फेडरेशन समाजाच्या सहकार, सामाजिक, आर्थिक समस्यांना सोडविण्यासाठी कार्य करणार असून फेडरेशन स्थापन करण्यासाठी उपस्थितीत सर्वांनी पाठींबा दर्शवला. फेडरेशन स्थापना उद्देशा विषयी गाबीत फिशरमेन फेडरेशन संयोजक विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी माहिती दिली. गंगाराम आडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
समाजाच्या अनेक विषयावर गाबीत फिशरमेन फेडरेशन कार्य करणार असून स्थानिक प्रशासन राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कार्य केले जाणार आहे. गाबीत समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी समाजाच्या अनेक संघटना सोबत घेऊन संघटीत पणे काम करण्याची भूमिका मोंडकर यांनी मांडली. तसेच लवकर सर्वांच्या सहमतीने फेडरेशनची कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष व गाबीत समाज वेंगुर्ला अध्यक्ष दिलीप गिरप, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, पत्रकार विष्णू धावडे, गाबीत समाज जिल्हा संघटक व महिला संस्था अध्यक्ष सौ. स्नेहा केरकर, तारकर्ली ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र केरकर, टीटीडिएस अध्यक्ष सहदेव साळगावकर, माजी नगरसेविका सौ. पूजा सरकारे, वसंत तांडेल, सहदेव बापर्डेकर, मालवण मच्छिमार सहकारी संस्था अध्यक्ष विकी चोपडेकर, सुरेश बापर्डेकर, पर्यटन महासंघ मालवण महिला अध्यक्ष मेघा गावकर, सुधीर कांदळगावकर यांनी गाबीत फिशरमेन फेडरेशन वाढीसाठी व पुढील वाटचाली संबंधी मार्गदर्शन केले.यावेळी रुपेश प्रभू, मनोज खोबरेकर, बाबी जोगी, सचिन गोवेकर प्रेमानंद चोडणेकर, प्रसाद मेहता तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाज बांधव उपस्थित होते.












