कोंबडीच्या पिल्लाला तीन पाय

देवली काळेथर येथील भजनीबुवा रवींद्र करलकर यांच्या घरी कोंबडीचा जन्म : पाहण्यासाठी गर्दी

मालवण | प्रतिनिधी : तीन पायाचे कोंबडीचे पिल्लू मालवणात कुतूहलाचा विषय बनले आहे. मालवण तालुक्यातील देवली काळेथर येथील भजनीबुवा रवींद्र करलकर यांच्या घरात एका तीन पायांच्या कोंबडीच्या पिल्लाचा जन्म झाला. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून तीन पायाचे कोंबडीचे पिल्लू कुतूहल आणि चर्चेचा विषय बनले आहे. अनेक ग्रामस्थ हे पिल्लू पाहण्यासाठी करलकर यांच्या घरी पोहचले. हे पिल्लू सुखरूप असून इतर पिल्लांप्रमाणेच तेही सामान्यपणे वावरत असल्याचे करलकर कुटुंबीयांनी सांगितले.