गावखडी /वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त यावर्षी ही मठामधे गुरूवार दिनांक – १०/०७/२०२५ रोजी गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे.
तसेच सकाळी श्री गुरूदेव हस्ते श्री स्वामी समर्थ पूजन, श्री स्वामी चरणांवर अभिषेक,श्री गुरूचरणांचे पूजन, भक्तगणांचे भक्तीभावाचे प्रतिपादन,दुपारी- श्री गुरूदेवांचे मार्गदर्शन,महानैवेद्य अर्पण व महाआरती,महाप्रसाद वाटप,श्री गुरूदेव चरण दर्शन, व सायंकाळी- ६ -३० वाजता मठामधे दिपोत्सव सोहळा इत्यादी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले आहे












