खेड – खेड पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. अहिरे यांचे शिवसेना उपनेते व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. संजय राव कदम यांच्या हस्ते औपचारिक स्वागत करण्यात आले. श्री. अहिरे यांची नुकतीच खेड पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या स्वागत प्रसंगी माजी आमदार संजय राव कदम यांनी श्री. अहिरे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आणि खेड तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत पोलीस प्रशासनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहील, असे सांगितले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अधिक सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ आण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, नगरसेवक अकुंश विचारे, उद्योजक संग्राम कदम यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे सदस्य व शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











