पोफळी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा पोफळी येथे आषाढी एकादशीनिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. सर्व विद्यार्थी वारकरी तसेच काही विद्यार्थी विठ्ठल व रखुमाईचा पोशाख परिधान करून आलेले होते. पांढरा सदरा,धोतर,डोक्यात टोपी ,कपाळाला गंध अशी साजेशी वेशभूषा विद्यार्थ्यांनी केलेली होती तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान केली होती.

प्रशालेतील शिक्षिका प्रतिभा धुमाळ मॅडम व सेविका पूजा लाड यांनी विद्यार्थ्यांकडून अभंग म्हणून घेतले तसेच विठ्ठल नामाचा गजर करून घेतला. श्री अशोक मिसाळ यांनी आषाढी एकादशीनिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. सर्वच विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर फुगड्या घालण्याचा मनमुराद आनंद घेतला. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महेंद्र कापडी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्री महेंद्र कापडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका शिवानी शिंदे, प्रतिभा धुमाळ, अशोक मिसाळ, साधना गायकवाड, रिता चव्हाण,अक्षता साळवी व सरिता मानकर यांनी केले.