आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचे पडसाद सिंधुदुर्गात उमटले.

ख्रिस्ती समाजाच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.

सिंधुनगरी प्रतिनिधी

आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती बांधवांसंदर्भात जे वादग्रस्त विधान केले आहे . यामुळे ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी आमदार पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात सिंधुदुर्गातील ख्रिश्चन समाज आक्रमक झाला असून जिल्हाधिकारी अनिल पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी पासकोल रॉड्रिग्ज, अनारोजीन लोबो, मायकल डिसोजा , लॉरेन्स मान्येकर , व्हिक्टर डान्टस, व्हिक्टर फर्नांडिस. व्हिक्टर पिंटो , पॉल फर्नांडिस, कारमिस अलमेडा, जॉय डॉटस, आगोस्तीन फर्नांडिस, ग्रेगरी डॉटस, सायमन अल्मेडा, किस्तू परेरा यांच्यासह अनेक ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी याना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की ,सिंधुदुर्ग रोमन कॅथॉलिक या पंथाचे सर्व ख्रिस्ती बांधव मागील शेकडो वर्ष सर्व समाजासोबत कोणताही जातीभेद न करता गुण्यागोविंदाने राहत आहोत. आमदार गोपीचंद पडळकर हे मागील काही कालावधीपासून ख्रिस्ती समाजाविरोधात वादग्रस्त विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आम्ही समस्त रोमन कॅथोलिक समाज कोणत्याही धर्म परिवर्तन करण्यासाठी कधीही पुढाकार घेत नाही आणि घेतला सुद्धा नाही. आमचे धर्मगुरू (फादरी) कोणतेही धर्म परिवर्तनास प्रोत्साहन देत नाहीत. आमचे सर्व प्रार्थना व धर्मविधी हे सर्व आमच्या रजिस्टर चर्च मध्येच होत असतात इतर कोणत्याही बाहेरील ठिकाणी प्रार्थना होत नाहीत. परंतु असे असूनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमच्या समाजाबद्दल व आमचे फादरांबद्दल वादग्रस्त विधान केलेले आहे. त्यामुळे आमच्या समाजाकडे सर्वसामान्य लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चुकीच्या मार्गाचे सोशल मीडिया द्वारे प्रसिद्ध होत आहे .

आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेले वक्तव्य हे वादग्रस्त असून भावना दुखावनारे आहे . आमदार म्हणून त्यांनी केलेले विधान जातीय तेढ निर्माण करणारे असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा तसेच त्यांच्याकडून समस्त कॅथोलिक ख्रिस्ती समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे .