गड किल्ले जागतिक वारसा यादीत; चिपळूणमध्ये भाजपकडून पेढे वाटून आनंदोत्सव

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील ११ गड किल्ले यांचा समावेश जागतिक वारसा म्हणून युनिस्कोने केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी चिपळूणच्या वतीने आनंदोत्सव पेढे वाटून व फटाक्याची आतषबाजी करून, घोषणा देत साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किल्ला प्रेमी निखिल किल्लेकर व सतीश वीरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. यावेळी उत्तर रत्नागिरीचे भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, वसंत ताम्हणकर, गणेश हळदे यांनी यावेळी भेट दिली. यावेळी शहराध्यक्ष शशिकांत मोदी, विजय चितळे, रत्नदीप देवळेकर, सारिका भावे, शितल रानडे, विमल लढ्ढा, सौ.पोटे, प्रज्ञा मोने, सुश्मिता विखारे, स्वाती पटवर्धन निखिल किल्लेकर, सतीश वीरकर, अभय चितळे, निनाद आवटे, अनिल दाभोळे,राम नलावडे, जतिन घटे, ध्यानेश्वर नलावडे, अभिषेक जागुष्टे, विशाल राऊत, अमित चिपळूणकर, कुणाल आंबेकर, उल्हास भोसले, श्री. दाभोळकर, नरेंद्र बेलवलकर, अपेक्षित घाणेकर, सुनंदा पवार, सौ. सय्यद, सौ. कदम, सौ. शिगवण, सोहम घोसाळकर, जुनेद बगदादी आदी उपस्थित होते.