कणकवली : गांधीनगर ग्रामपंचायत माजी सदस्य मंगेश सावंत यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे. हा प्रवेश म्हणजे सतीश सावंत व प्रथमेश सावंत यांना धक्का मानला जात आहे. कनेडी बाजारपेठ येथील नाटळ सांगवे विभागीय कार्यालय येथे माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, माजी सरपंच शेखर सावंत, मिलिंद बोभाटे, प्रशांत सावंत, सुधीर सावंत, अमीर सावंत, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या माध्यमातून गांधीनगर गावात झालेली विकास कामे तसेच उर्वरित विकास कामांसाठी माजी जि. प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत व संजना सावंत यांचा विकास कामांसाठी सततचा असलेला पाठपुरावा यामुळे आपण प्रवेश करीत असल्याचे मंगेश सावंत यांनी सांगितले.













