वाटद खंडाळा येथे परराज्यातील तरुणाने राहत्या चाळीत गळफास घेत केली आत्महत्या

crime

 

रत्नागिरी ः प्रतिनिधी

तालुक्यातील वाटद खंडाळा येथे परराज्यातील तरुणाने राहत्या चाळीत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 20 जुलै रोजी दुपारी 1 वा.सुमारास उघडकीस आली.

मदन मोहन कामटी (35,मुळ रा.जि.मधुबनी ,बिहार सध्या रा.वाटद खंडाळा,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मदन कामटी याला दारुचे व्यसन होते. त्याचे फोनवर पत्न्ाीसोबत भांडण झाले होते. या कारणातून त्याने राहत्या चाळीमधील रुममध्ये सिलिंग फॅनला टॉवेलने गळफास घेतला. ही बाब आजुबाजुच्या शेजार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी मदन कामटीला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.