मुरुगवाडा येथील गळफास घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी
दारु पिउ नकोस असे सांगितल्याच्या रागातून मुरुगवाडा येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. उपचारांदरम्यान त्याचा सोमवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.50 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.
वैभव विलास पाटील (33,रा.मुरुगवाडा,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा.सुमारास त्याच्या घरातील नातेवाईकांनी त्याला दारु पिउ नकोस असे सांगिले होते. या गोष्टीचा राग आल्याने वैभवने घराच्या वरील रुममध्ये लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू अतिदक्षता विभगात उपचारांदरम्यान सोमवार 27 ऑक्टोबर रोजी वैभवचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.