शंभर वर्षा ची परंपरा असलेल्या वेंगुर्ले रामेश्वर मंदिरातील भजनी सप्ताहाची काल्याने समाप्ती…

वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले चे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर देवस्थानचा भजनी सप्ताह हा गेली शंभर वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. आजही परंपरा ही जपली जाते. सात दिवस धार्मिक विविध देखावे मंदिरात सजविले जातात. त्याच बरोबर स्थानिक कलाकारांना कलेला वाव देण्यासाठी रांगोळी सादरीकरण कलाकार करतात. भजनी सप्ताहात विविध भजनी मंडळांची भजने सात दिवस अविरतपणे सुरू असतात. शेवटच्या दिवशी देवाची पालखी प्रदक्षिणा करून काल्याने या सप्ताहाची सांगता झाली.

वेंगुर्ले गावाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. वेंगुर्ले हे प्रमुख बंदर तसेच मुख्य बाजारपेठ होती. पूर्वीच्या काळात गावावर दुष्काळस्थिती आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी श्री देव रामेश्वर देवास येथील लोकांनी साकडे घातले त्यानंतर ते संकट दूर झाल. तेव्हा पासून गेली शंभर वर्षे पेक्षा जास्त काळ रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह साजरा केला जातो.

सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पालखी प्रदक्षिणेच्या वेळी वारकरी भजन सादर करताना विविध खेळ खेळत मनोरंजनातून भजने सादर करण्यात आली. यातच लहान मुलांपासून महिला व वृद्धही सहभागी होत तल्लीन होऊन नाचत भगवंताच्या नामात पालखी प्रदक्षिणा मद्ये सहभागी झाले. शेवटी महाआरती व देवास साकडे घालून सप्ताहाची सांगता झाली. सात दिवस मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.