दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांची लोकचळवळ..
लोककलेचा हा विशेष उपक्रम २४ ऑक्टोंबर रोजी होणार सादर..
वेंगुर्ले : दाजी नाईक
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव उलगडणारा लोककलाभीमुक “द फोक आख्यान” याचा विशेष प्रयोग येत्या २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता मेजर ध्यानचंद क्रीडांगण वेंगुर्ला कॅम्प येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रयोगाची संकल्पना ही वेंगुर्ला तालुक्यातील विविध सामाजिक संस्था एकत्र येऊन सगळ्याच्या माध्यमातून समोर आली आहे. राज्यासह जिल्ह्यात आणि आपल्या तालुक्यात जी आता दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी नेहमीच आपण शासनावर अवलंबून न राहता समाजाने एकत्र आले पाहिजे म्हणून ही लोकचळवळ म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. या सगळ्याच्या माध्यमातून एक निधी उभा रहावा, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला या दुष्काळ निवारणासाठी या पुढच्या काळामध्ये अनेक उपक्रम करावे लागतील आणि त्याची सुरुवात या वेगळ्या प्रकारे आम्ही या ठिकाणी या विशेष प्रयोगाच्या माध्यमातून करत आहोत. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, कार्यक्रम स्थळी बसण्यासाठी ज्या जागा आहेत त्या खूप मर्यादित आहेत. तरी आपली जागा आताच बुक करा. बुकिंग करण्यासाठी ऑनलाइन सुविधा आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी त्यांच्यासोबत वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, माझा वेंगुर्ला चे राजन गावडे, बाळू खामकर, रोटरी क्लब चे योगेश नाईक, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रशांत आपटे, प्रीतम सावंत, सदानंद गिरप, पंचायत समिती सदस्य आपा फणसेकर, कमलेश गावडे, तुषार साळगावकर, हितेश धुरी, भूषण आंगचेकर, राजबा सावंत, यतीन आवळेगावकर, राहुल पै, डॉ. काळे, कपिल पोकळे, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त बांधवांच्या वेदनांची संवेदनशीलतेने नाते जोडत त्यांच्या मदतीसाठी हा सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या परीने सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारावे तसेच कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाज हितासाठी एकत्र यावे हा या आयोजनामधील प्रमुख उद्देश आहे असे श्री दळवी यांनी सांगितले. जगाच्या पटलावर महाराष्ट्राची संस्कृती या प्रयोगाच्या माध्यमातून खरंतर सादर केली जाते आणि हा लोकप्रिय अशा प्रकारचा प्रयोग आमच्या वेंगुर्ले या ठिकाणी दाखवला जातोय याचा लाभ या तालुक्याबरोबरच या जिल्ह्यातल्या या जिल्ह्याच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा घ्यावा अशा प्रकारचे या निमित्ताने मी आवाहन आहे.
नाव नोंदणीसाठीची सुरुवात जी आहे ती आजपासून झालेली आहे. याच्यासाठी आम्ही डोनर पास म्हणून फक्त शंभर रुपये त्या ठिकाणी ठेवलेले आहेत परंतु या सगळ्याबरोबरच जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला दुष्काळ निवारणासाठी निधी संकलन हा खरंतर या सगळ्याच्या मागचा उद्देश आहे. या सगळ्यात प्राप्त होणारा निधी हा दुष्काळ निवारणासाठीच्या कामासाठी वापरला जाईल आणि यासाठी आज आम्ही सर्व उपस्थित प्रमुख मंडळी या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच ही कला पाहण्यासाठी सगळ्यात रसिका प्रेक्षकांना आवाहन करतो, की आपण या सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आस्वाद घ्यावा आणि यासाठी उत्स्फूर्त सहभाग सुद्धा नोंदवावा.
लोक चळवळीतून जलसंधारणाच्या कामांवर असणार भर
लोक चळवळीच्या माध्यमातून जलसंधारणाची काम उभारावी अशा प्रकारचा खरतर या मागच्या सगळ्यांचा उद्देश आहे आणि जलसंधारणा बरोबर दुष्काळ निवारण आणि दुष्काळ निवारणाच्या बरोबर या ठिकाणी या सगळ्या दुष्काळामुळे किंवा शेतकरी यांच्यावर जो आजचा इफेक्ट झालेला आहे. जे काही नागरिक या सगळ्यात झगडत आहेत या सगळ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे उपक्रम या सगळ्याच्या माध्यमातून एक पर्यावरण संतुलन करण्यासाठीचे उपक्रम असतील. त्याशिवाय जल साठा वाढवण्यासाठी जे काही उपक्रम असतील जलसिंचन वाढवण्यासाठी जे काही उपक्रम असतील अशा प्रकारचे उपक्रम या सगळ्याच्या माध्यमातून एक तालुका म्हणून शासनावर अवलंबून न राहता या तालुक्यातल्या सगळ्यात सामाजिक संस्था या जिल्ह्यातल्या काही सामाजिक संस्था एकत्रित येऊन आम्ही हा उपक्रम हाती घेत आहोत. आणि यापुढे निरंतर चालणारा हा कार्यक्रम एक चळवळ म्हणून असणार आहे.













