.ओटवणे (प्रतिनिधी ) सर्व समाज आंबेडकरी समाज बांधवाना एकत्र आणण्याच्या उद्देशाने महासंघ स्थापन करण्याचा मानस अखेर सत्यात उतरला असून संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्ग ची स्थापन करण्यात नुकतीच करण्यात आली . या महासंघाच्या अध्यक्षपदी महेश परुळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली तर कार्यकारिणी मध्ये कार्याध्यक्ष पदी रमाकांत जाधव,महासचिव म्हणून कणकवली माजी नगरसेवक गौतम खुडकर, जिल्हा संघटक पदी अंकुश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विजय कदम, एडव्होकेट एस. के. चेंदवणकर, एडव्होकेट विलास कुडाळकर, दिलीप वाडेकर, आनंद देवगडकर.जिल्हा कोषध्यक्ष अर्जुन आयनोडकर, सह कोशाध्यक्ष देवदत्त कदम, कायदेशीर सल्लागार एडव्हो. नामदेव मठकर, एस. व्ही. कांबळे यांची निवड एकमताने करण्यात आली. या महासंघाची महत्वाची सभा कुडाळ रेस्ट हाऊस येथे नुकतीच संपन्न झाली. या सभेत ही निवड करण्यात आली.ही सभा जेष्ठ आंबेडकरी चळवळीतील नेते आणि रिपब्लिकन पार्टी चे (आठवले गट) राज्य सहसचिव रमाकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व बसपा चे जेष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर, समाजभूषण पुरस्कार प्राप्त व बौद्ध महासभेचे नेते प्रभाकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
सभेची सुरुवात माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सर्वांचे स्वागत करून केली.सभेचे अध्यक्ष स्थान जेष्ठ नेते रमाकांत जाधव यांनी स्वीकारावे असे पत्रकार शंकर जाधव यांनी सुचविल्या नंतर विश्वनाथ पडेलकर (भाजपा अध्यक्ष देवगड )यांनी अनुमोदन देत सभेला सुरुवात केली. मागील सभेचे इतिवृत्त वाचन कणकवली माजी नगर सेवक गौत्तम खुडकर यांनी केले. महासंघाला विश्वस्त मंडळ की कार्यकारी अध्यक्ष मंडळ हवं विषय सभागृहात चर्चेत ठेवला. यावर उपस्थितांनी खूप अभ्यासपूर्ण मांडणी करत चर्चा केली. सर्वानुमते कार्यकारी अध्यक्ष मंडळ असायला हवे. तसेच एक कोअर कमिटी स्थापन करावी. सर्व अधिकार कोअर कमिटीला देण्यात यावे व त्यांचेच मार्गदर्शन आणि निर्णया नुसार अध्यक्ष व कार्यकारिणी काम करेल असं ठरविण्यात आले. ही कार्यकारिणी एक वर्षासाठी असेल असेही घोषित केले.
सभेला वंचित बहुजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, समाजभूषण पुरस्कार प्राप्त तथा बौद्ध महासभेचे नेते प्रभाकर जाधव, माजी नगरसेवक गौत्तम खुडकर,नगरसेवक ऍड.विलास कुडाळकर, ऍड. एस. के. चेंदणनकर, विजय कदम,पत्रकार शंकर जाधव, आनंद देवगडकर, दिलीप वाडेकर, विश्वनाथ पडेलकर,जयंत जाधव, सखाराम जाधव, वामन कांबळे,दुलाजी चौकेकर, ऍड. नामदेव मठकर,ऍड. एस. व्ही. कांबळे,वासुदेव जाधव, संदेश कदम,सचिन जाधव, बाळा जाधव, विष्णू तेंडोलकर, विनोद कदम,सत्यवान तेंडोलकर, मंगेश गावकर,देवदत्त कदम, के. एस. कदम,संदीप जाधव, चंद्रकांत वालावलकर,आनंद धामापूरकर,केशव जाधव,सुधीर अणावकर,चंद्रकांत म्हापणकर,सरपंच सुशील कदम,सुशील जाधव, तुषार जाधव आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष महेश परुळेकर व अंकुश जाधव यांनी मार्गदर्शन करताना समाजाचाचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार आयोजित करूया.एकाच मंचावर अनेक प्रश्न शासनाचे प्रतिनिधी म्हूणन पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत सुटू शकतील. यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. पालकमंत्री नामदार राणे यांची वेळ घेऊन जनता दरबार घेऊन समाज हितासाठी आवश्यकता असेल तिथे लोकप्रतिनिधी यांची मदत घेऊया,संघर्ष करायचा गरज असेल तिथे संघर्ष करून रस्त्यावर उतरू. पण सुसंवाद साधून प्रश्न सुटत असतील तिथे संवाद साधुया. पालकमंत्री नामदार राणे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जनता दरबारा साठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया व खऱ्या अर्थाने समाज जोडूया असे आवाहन केले. सभाध्यक्ष जाधव यांनी सभेचा समारोप करत असताना महासंघाची भूमिका स्पष्ट केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळ्या झेंड्या खाली सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया. आपण या ऐतिहासिक घटनेचे भागीदार आणि साक्षीदार होत आहोत. या पूर्वी असा प्रयोग झाला नव्हता पण आपल्या सर्वांच्या पुढाकारने आणि आग्रही भूमिका यामुळे च हा महासंघ निर्माण झाला आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांचे नाव सभागृहात खूप वेळ चर्चेत आलं आणि त्यांनी स्वीकारावं अशी आग्रही भूमिका बऱ्याच जणांनी मांडली. पण जाधव यांनी पदापेक्षा आपल्याला समाजहित आणि समाज जोडो हे खूप महत्वाचे वाटत आहे म्हणुन त्यांनी नम्र पणे आलेली संधी नाकारत महेश परुळेकर यांना संधी द्यावी अशी विनंती केली.या महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आंबेडकरवादि समाज एकसंघ व्हावा आणि समाजाला एक वेगळी दिशा मिळावी त्यांच्या समस्या अडी अडचणी या माध्यमातून सोडविल्या जातील अशा प्रकारचे मार्गदर्शन सभेत करण्यात आले.













