हडी-कोथेवाडी येथे हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!

​मसुरे | झुंजार पेडणेकर :  हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री देव मार्गेश्वर नाट्यमंडळ, हडी-कोथेवाडी यांच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
​१ एप्रिल २०२६ रोजी रात्री ठीक ११:०० वाजता प्रवीण शांताराम लिखित आणि महेश सावंत पटेल दिग्दर्शित ‘नाना फाटले’ हे दोन अंकी धमाल विनोदी नाटक सादर केले जाणार आहे. २ एप्रिल रोजी
​सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा, ​दुपारी महाप्रसाद,
​सायंकाळी स्थानिक भजनी मंडळांची सुस्वर भजने. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव मार्गेश्वर नाट्यमंडळ आणि मित्रमंडळ, हडी-कोथेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.