राजापूर वार्ताहर): महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी राजापूर यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात २८ रक्तदात्यांनी सहभागी होवून रक्तदान केले.
राजापूर ग्रामिण रूग्णालयात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मोहन घुमे, एकनाथ मोंडे, राज्य परिषद सदस्य महादेव गोठाणकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, अनिलकुमार करगुटकर, सुरेश गुरव, भास्कर सुतार, अभिजित गुरव, रवींद्र नागरेकर, अमजद बोरकर शीतल पटेल श्रुती ताम्हनकर, शीतल गोठणकर, शीतल रहाटे, प्रा. मारुती कांबळे, चंद्रकांत लिंगायत, सुधा चव्हाण, अमोल सिनकर, आशिष मालवणकर, संतोष धुरत, संदेश विचारे, अमर वारेशे, संदीप तेरवणकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












