जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपक्रम
संतोष कुळे lचिपळूण: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चिपळूण सावर्डे येथे एमपीएससी व युपीएससी मोफत वाचनालयाचे उद्घाटन शुक्रवार २५ रोजी सकाळी १० वाजता संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते होणार आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी खास मोफत अभ्यासिका, पोलीस अकॅडमी प्रशिक्षण, पोलीस भरतीचे प्रशिक्षण, मोफत आरोग्यसेवा असे अनेक सेवाभावी उपक्रम ही संस्था राबवत आहे. या संस्थेच्या माध्यमातून आता चिपळूण सावर्डे येथील सह्याद्री प्रिंटिंग प्रेस शेजारी केदारनाथ सहानेच्या मागे एमपीएससी व यूपीएससी मोफत वाचनालय सुरू होणार आहे. या वाचनाचे उद्घाटन स्वतः संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते होणार आहे . यावेळी व्याख्याते लेखक प्राध्यापक गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
चिपळूण परिसरातील मुलांना या मोफत वाचनालयाचा निश्चितच फायदा होणार आहे ज्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उतरण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे. या मोफत वाचनाच्या उद्घाटनासाठी सर्व जिजाऊ संघटनेची निगडित आणि समाजातील सर्व बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सुद्धा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.












