गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंद येथील,माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री राजेसावंत भोसले होत्या.
कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे बालपण,व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी आपले विचार मांडले.यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री राजेसावंत भोसले,कीर्ती दामले,तनया चव्हाण,भाग्यश्री सहस्त्रबुद्धे आदी शिक्षिकांनी आपले विचार मांडले.
यावेळी गौरी कोकाटे,भक्ती महाडिक,माधवी लघाटे,आदींसह अन्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.










