खेड ( प्रतिनिधी) महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार योगेश कदम यांनी भरणे येथील महिला मेळाव्यात दिली. तसेच महिलांनी स्वांयरोजगारासाठी एक पाऊल पुढे टाकावे आमदार म्हणून मी दहा पाऊले पुढे येईन अशी ग्वाही सुद्धा आमदार योगेश कदम यांनी उपस्थित महिलांना यावेळी दिली.
खेड तालुक्यातील भरणे नाका येथे तालुका शिवसेनेच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महिला मेळाव्याला जिल्हा संघटक रश्मी गोखले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रोहिणी दळवी, उपजिल्हा संघटिका सौ. सुप्रिया पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अस्मिता केंद्रे, सोनाली जाधव, सानिका आंब्रे, माजी सभापती रतन रांगडे, अपर्णा नक्षे, मानसी जगदाळे, शहर संघटिका माधवी बुटाला, सौ. अंजली गुरव, स्वाती चव्हाण, मुग्धा भोसले, गोरे मॅडम, चव्हाण तांबट, रेखा चव्हाण, विदयुता भोसले, उज्वला कदम, श्रद्धा दरेकर, मीनाक्षी मोकाशी, पूनम जाधव, सौ. धाडवे, सौ. पाटील यांच्यासह सर्व आजी – माजी सरपंच, महिला पधादिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार योगेश कदम यांनी दापोली तालुक्यात महिला बचत गटांनी सुरु केलेल्या उद्योगाबाबत माहिती दिली. ज्या प्रमाणे त्या महिला बचत गटाना अडीच लाख रुपयांची मदत केली अगदी त्याच प्रमाणे खेड तालुक्यातील महिला बचत गटाना सुद्धा सक्षमिकारणासाठी एखादा व्यवसाय सुरु करायचा झाल्यास आपण निश्चित मदत करू असे आश्वासन यावेळी दिले. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती ही लक्षनीय असल्याचे पाहायला मिळाले. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्याबाबत यावेळी निश्चय करण्यात आला.










