शेनाळे शाळेत भरले रानभाज्यांचे प्रदर्शन

मंडणगड/प्रतिनिधी  l जिल्हा परिषद पूर्ण

प्राथमिक आदर्श शाळा ही तालुक्यातील एक उपक्रमशील

शाळा म्हणून नावारूपाला आलेली शाळा आहे. आज या शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री सुनिल आईनकर यांच्या संकल्पनेतून आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत कोकणात मिळणाऱ्या “रानभाज्यांचे प्रदर्शन” आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यानी अनेक प्रकारच्या भाज्या स्वतः आणून प्रदर्शनामध्ये मांडल्या होत्या .आणि त्याचे उत्तम प्रकारे सादरीकरण करून रानभाज्यांपासून आपल्याला मिळणारे फायदे सर्व उपस्थित पालक तसेच सर्व विद्यार्थी यांना पटवून दिले. खरंतर खूपच आनंददायी असा हा उपक्रम होता. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना रानातील भाज्यांची माहिती व त्याचे उपयोग समजले.यामध्ये भारंगी, टाकला, काटले ,कुरडू ,अळू ,कढीपत्ता, सुरण, कुडाच्या शेंगा , दारची भाजी, तेरीचे कांदे ,शेवगा, चहापात, तेरी ,लालमाठ ढानगी, कालेरू, मोहरी अशा एकूण अठरा प्रकारच्या भाज्यांचा समावेश होता. आणि या सर्व भाज्या आपल्या रानामध्ये मिळतात. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या सर्व भाज्या वर्षातून एकदा तरी खाव्यात अशी शिकवण आजच्या या प्रदर्शनातून मुलानी सर्वाना दिली आणि रानातील भाज्या खाण्याची शपथ आजच्या दिवशी मुलांनी घेतली प्रदर्शन कार्यक्रमाला माजी सरपंच श्री.विश्वनाथ सावंत, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष पूजा कुटेकर, महिला मंडळ अध्यक्षा सुश्मिता मनवे.ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया धोंडगे, पूजा शिंदे , पूर्वा बाणे असे ग्रामस्थ तसेच पालक उपस्थित होते. सर्वांनी मुलांच्या या कल्पकतेचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सतिश खैरे, संध्या शेले, गणेश गुळेकर यांनी मोलाचे सहकार्य केले…