दुःखद निधन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ,श्रेष्ठ कीर्तनकार रामकृष्ण गणेश उर्फ दादा दाभोलकर कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांचे काल रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. उत्कृष्ट शिक्षक,कीर्तनकार,गायक, दिलरुबा (एक तांतुवाद्य) वादक,करताळं (कीर्तनात वाजवायच्या लाकडी पट्ट्या)वादक आणि तरीही प्रसिद्धी परान्मुख अशी त्यांची ओळख होती. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर त्यांचे अनेक कीर्तनाचे व गायनाचे कार्यक्रम झाले. तसेच आकाशवाणी वरुन सुद्धा त्याची कीर्तने प्रसारित झाली . सुप्रसिद्ध कीर्तनकार भाऊ नाईक (वेतोरे), वासुदेव सडवेलकर पिंगुळी, अरुण सावंत वेंगुर्ला यांना त्यांच्याकडून कीर्तनाचे मार्गदर्शन लाभले.भगवद्भक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नामांकित संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.













