विमा प्रतिनिधी सौ सुनेत्रा तांबे , आर एच पी फाऊंडेशन तर्फे दिव्यांग व्यक्तीस व्हील चेअरची मदत

रत्नागिरी :  भंडारपुळे येथील कु.स्मिता पद्माकर पाटील (वय ४६ वर्ष) शिक्षण ७वी पास हि एक वर्षाची असताना तापात दोन्ही पायांना पोलिओ झाला.चालता कधीच आले नाही.७वी पर्यत गावातील शाळेत आई उचलुन घेवुन जायची.पुढील शिक्षणासाठी मालगुंड येथे जावे लागले असते आणी ते शक्य नसल्याने ७ वी तुनच शाळा सोडावी लागली.वडील शेती करायचे तर आई गृहीणी आहेत.दोन भाउ व दोन बहीणी सर्व विवाहीत आहेत.

सुरवातीला घरात रांगतच सर्व गोष्टी करायला लागायच्या बाहेर जाताना उचलुनच न्याव लागायचे नंतर सिव्हील हॉस्पीटल रत्नागीरीमधुन व्हीलचेअर मिळाली.त्यामुळे थोड बाहेर जाण येण सोप झाले.घरातच ती शिवण काम करायची.त्यालाही तिचा खूप उपयोग होत होता.कालांतराने ती व्हीलचेअर खराब झाली.

स्मिताच्या भावाने आर एच पी फाऊंडेशनला व्हीलचेअर संदर्भात संपर्क साधला .संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी स्मिताची सविस्तर माहिती घेतली.संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांना त्यांच्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील सहकारी विमा प्रतिनिधी सौ सुनेत्रा संजय तांबे यांनी दिव्यांगासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्या प्रमाणे समीर नाकाडे यांनी सौ.सुनेत्रा तांबे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी दिव्यांग कु.स्मिता पाटील हिला उपयुक्त अशी व्हीलचेअरची मदत केली.त्यामुळे पाटील कुटुंबीयांनी सौ.सुनेत्रा तांबे व आर एच पी फाऊंडेशनचे आभार मानले.
व्हील चेअर वाटप करताना विमाप्रतिनिधी सौ.सुनेत्रा तांबे आर एच पी फाऊंडेशनचे संस्थापक श्री.सादिक नाकाडे,स्वानंदी पाटील, आणि अमर आढाव उपस्थित होते.