शिवसेना कुडाळ उप तालुकाप्रमुख पदी देवेंद्र नाईक यांची नियुक्ती

कुडाळ l प्रतिनिधी : शिवसेना कुडाळ उप तालुकाप्रमुख पदी देवेंद्र नाईक यांची नियुक्ती झाली आहे. आ. निलेश राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. गेली अनेक वर्षे ते राजकारण तसेच समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या या निवडीनंतर जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

यावेळी उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, अरविंद करलकर, दीपक नारकर, विनायक राणे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, विधानसभा प्रमुख प्रीतम गावडे, ओंकार चव्हाण, चेतन पडते आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.