रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार

दापोली तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून, शनिवारी दापोली तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये आज एकूण सरासरी 14.75 मिमी पाऊस झाला, तर एकूण 132.77 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज पडलेल्या पावसाची आकडेवारी:
* दापोली: 35.71 मिमी
* मंडणगड: 26.5 मिमी
* लांजा: 21.00 मिमी
* संगमेश्वर: 19.25 मिमी
* खेड: 14.28 मिमी
* चिपळूण: 8.33 मिमी
* गुहागर: 4.40 मिमी
* राजापूर: 1.75 मिमी
* रत्नागिरी: 1.55 मिमी
जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत दापोली, मंडणगड आणि लांजा या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते.