रत्नागिरीत “कांचन डिजिटल” तर्फे सहावी घरगुती गणपती सजावट स्पर्धा

रत्नागिरी – जिल्ह्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या “कांचन डिजिटल” तर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे दिमाखात आयोजन करण्यात आले आहे. आज अंगारकी संकष्टीच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात आली.

गणेशभक्तांत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून, यंदा प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. तसेच विशेष उल्लेखनीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिकांसह “सुबक गणेशमूर्ती” या नव्या पारितोषिकाची वाढ करण्यात आली आहे. हे पारितोषिक स्पर्धेत सहभागी घरगुती सजावटीत असलेल्या गणेशमूर्तीपैकी निवडलेल्या मूर्तीच्या मूर्तिकाराला देण्यात येणार आहे.

तालुकास्तरावर आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत गणेशमूर्ती, आरास, देखावा यामध्ये सुबकता, पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक आशयासह संदेश देणारे सादरीकरण, तसेच पर्यावरणपूरक साहित्याचा वापर याला प्राधान्य दिले जाणार आहे. धर्माकॉल, प्लॅस्टिक, फ्लेक्स यांसारख्या पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या वस्तूंचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पारितोषिके:

पहिलं बक्षीस – ₹15,000 व ट्रॉफी

दुसरं बक्षीस – ₹10,000 व ट्रॉफी

तिसरं बक्षीस – ₹6,000 व ट्रॉफी

विशेष उल्लेखनीय व उत्तेजनार्थ पारितोषिके

नावनोंदणीसाठी संपर्क:

94225767368, 999332757

अंतिम तारीख – 24 ऑगस्ट 2025

स्पर्धेचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांद्वारे करण्यात येईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील. गणेशभक्तांनी उत्साहाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन कांचन मालगुंडकर यांनी केले आहे.