फोंडाघाट | कुमार नाडकर्णी —
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग द्वारा सरस्वती विद्यालय नांदगाव येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.I)14 वर्ष वयोगट मुले 1) रुद्राक्ष विजयकुमार राठोड ( प्रथम क्रमांक )II)14 वर्ष वयोगट मुली1) कु.निर्झरा सखाराम हुंबे ( द्वितीय क्रमांक )2) कु.श्रेया साहिल डोर्ले ( तृतीय क्रमांक ) III)17 वर्ष वयोगट मुली1)कु.नेहा विजय गोसावी ( पाचवा क्रमांक) IV)19 वर्ष वयोगट मुली1) कु.गायत्री विजयकुमार राठोड ( तृतीय क्रमांक ).
या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून या विद्यार्थ्यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व संचालक, मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, पर्यवेक्षक श्री.व्ही.पी.राठोड,सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले.तसेच जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.












