मालवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने कट्टा बाजारपेठ येथे 14 ऑगस्ट रोजी आयोजन
हर घर तिरंगा अभियान
मालवण | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी मालवण ग्रामीण मंडलच्या वतीने गुरुवार 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. कट्टा बाजारपेठ येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण मंडल मधील सर्व पदाधिकारी, जिल्हा व मंडल कार्यकारणी सदस्य, सर्व मोर्चाचे पदाधिकारी व सदस्य,बुथ अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते यांनी सकाळी 10 वाजता कट्टा वराडकर हायस्कुल येथे उपस्थित राहावे.
तिरंगा रॅली वराडकर हायस्कुल ते कट्टा पेट्रोल पंप ते वराडकर हायस्कूल या मार्गांवरून निघणार आहे. शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सहभागी होतील. अशी माहिती भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.











