रत्नागिरीत लांजा तालुक्यात सर्वाधिक 14.60 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी: जिल्ह्याच्या गेल्या २४ तासांत काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आज दिवसभरात जिल्ह्यात सरासरी ९.८५ मिमी पावसाची नोंद झाली असून, एकूण पाऊस ८८.७० मिमी इतका झाला आहे.

आजच्या नोंदीनुसार, लांजा तालुक्यात सर्वाधिक १४.६० मिमी पावसाची नोंद झाली, तर त्याखालोखाल चिपळूणमध्ये १४.०० मिमी आणि राजापूरमध्ये १३.२५ मिमी पाऊस झाला.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिमी)

* मंडणगड – १०.२५

* खेड – ११.४२

* दापोली – ५.००

* चिपळूण – १४.००

* गुहागर – ४.८०

* संगमेश्वर – १२.१६

* रत्नागिरी – ३.२२

* लांजा – १४.६०

* राजापूर – १३.२५

जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत जिल्ह्यात पावसाचे प्रमाण असेच कायम राहण्याची शक्यता आहे.