डीबीजे महाविद्यालयात रानभाज्यांचे प्रदर्शन

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे नुकताच रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात विद्यार्थ्यांना आपल्या कोकणात पावसाळ्यात ज्या विविध रानभाज्या येतात त्यांची ओळख व्हावी यासाठी महाविद्यालयात विविध रानभाज्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
या प्रदर्शनात आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या आणल्या. यामध्ये टाकळा, भारंगी, पेवा, कुडा, आळू अशा विविध रानभाज्या होत्या. ३८ विद्यार्थीनींनी वेगवेगळ्या भाज्या या प्रदर्शनात मांडल्या. या रानभाज्याची विद्यार्थ्यांनी विक्री देखील केली. प्राचार्य डॉ. माधव बापट यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ सौ.सुजाता खोत, प्रा.मयुर रामटेके, प्रा.उल्हास मोहिते, प्रा.अनिल पुनवतकर, प्रा.निपाणे तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा.नामदास, प्रा.माने, प्रा.दवणे आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा .सौ. उज्ज्वला कुलकर्णी व महिला विकास कक्ष सदस्यांनी परिश्रम घेतले.