रत्नागिरी:
रत्नागिरी पोलिसांना घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात मोठं यश मिळालं आहे. जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणपतीपुळे येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या एकूण ₹2,36,200 किंमतीच्या मुद्देमालापैकी 95% मुद्देमाल म्हणजे ₹2,21,530 किंमतीचे दागिने आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरू करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. कुलदीप पाटील यांना तपासासाठी सूचना दिल्या.
या गुन्ह्यामध्ये रोशन सुरेश जाधव (वय 21) आणि हैदर अजीज पठाण (वय 27) या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यापैकी आरोपी क्रमांक 2, हैदर अजीज पठाण, याच्यावर रायगड, मुंबई शहर आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांमध्ये यापूर्वी चोरी आणि घरफोडीचे असे एकूण 15 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं आहे.
ही यशस्वी कारवाई श्री. कुलदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली, ज्यात खालील अधिकाऱ्यांचा समावेश होता:
* पोलीस उपनिरीक्षक श्री. विलास दीडपसे
* सहायक पोलीस फौजदार अनिल गुरव
* पोलीस हवालदार राहुल घोरपडे
* पोलीस हवालदार मिलिंद कदम
* पोलीस हवालदार मंदार मोहिते
* पोलीस हवालदार निलेश भागवत
* पोलीस हवालदार संतोष शिंदे
* पोलीस हवालदार संदेश मोंडे
* महिला पोलीस कॉन्स्टेबल सायली पुसाळकर
* पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव
* पोलीस कॉन्स्टेबल पवन पांगरीकर
* पोलीस कॉन्स्टेबल आदित्य अंकार