प्रवासात झोपलेल्या महिलेची पर्स लंपास; ६३,५५० रुपयांचा ऐवज चोरीला

रत्नागिरी ः प्रतिनिधी
रेल्वे प्रवासादरम्यान झापलेल्या वुध्द महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. पर्समध्ये सोन्याचा हार,नथ,रोख 15 हजार रुपये,मोबाईल,मंगळसूत्र असा एकूण 63 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल होता. रेल्वे चोरीची ही घटना 8 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वा.सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर घडली.
याबाबत गितांजली गणेश राउळ (57,मुळ रा.कुडाळ सिंधुदुर्ग सध्या रा.विरार,मुंबई) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,फिर्यादी महिला ही पती गणेश राउळ, पुतणी समिक्षा राउळ असे 7 ऑगस्ट रोजी विरारहून कुडाळ या आपल्या गावी जाण्यासाठी वेरावल एक्सप्रेसमधून प्रवास करत होत्या. ही रेल्वे 8 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वा.सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर थांबलाी. त्यानंतर पुन्हा पुढील प्रवासासाठी सुटली असता अज्ञात चोरट्याने 6 वा. सुमारास फिर्यादी गितांजली राउळ झोपी गेलेल्या असल्याची संधी साधत त्यांची त्यांची पर्स ओढून घेत प्लॅटफॉर्मवर उडी मारुन पळ काढला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.