
मसुरे | झुंजार पेडणेकर : केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्राटर फॉर एग्रीकल्चर अंतर्गत ॲग्री स्टॅक हा प्रकल्प संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे. मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या आदेशानुसार मालवण तालुक्यातील हडी ग्रामपंचायत कार्यालय येथे ॲग्री स्टॅक नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता. सदर मोहीम मध्ये 32 टीम सहभागी झालेले होत्या. एकूण 1678 कुटुंबांना भेट देण्यात आले. त्यापैकी 320 कुटुंबांचे ॲग्री स्टॅक नोंदणी करण्यात आली. काही कुटुंब बाहेरगावी असल्याने नोंदणी करण्यात आली नाही. सदर ॲग्री स्टॅक मोहीम साठी तहसीलदार वर्षा झाल्टे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, सरपंच श्री. प्रकाश तोंडवडकर, उपसरपंच श्री. भरत लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री भावेश सुर्वे, तसेच विस्तार अधिकारी श्री लक्ष्मण हांडे, कृषी विस्तार अधिकारी व्ही के जाधव, सुधीर गायकवाड, मंडळ अधिकारी सौ पिंगुळकर मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एस चौरे , महसूल ग्राम अधिकारी श्री वरुडे कृषी सहाय्यक श्री विवेक रंगे, मालवण तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी,सर्व महसूल ग्राम अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, महसूल सेवक, ग्रामपंचायत हडी कर्मचारी ,सर्व अंगणवाडी सेविका , सर्व पोलीस पाटील ,सर्व आशा स्वयंसेविका दोन्ही सीआरपी, कृषी मित्र श्री शेडगे व नरे व ज्येष्ठ नागरिक संघटना चे अध्यक्ष श्री. देविदास सुर्वे , व ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे सदर मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली. या मोहिमेमुळे हडी गावाने ॲग्री स्टॅक नोंदणी मध्ये आघाडी घेतलेले आहे. ग्रामपंचायत हडी च्या वतीने सर्वांचे सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी आभार व्यक्त केले.












