चंद्रकांत वालावलकर यांची वालावल गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड

कुडाळ lवालावल गावाचे समाजिक कार्यकर्त श्री चंद्रकांत वालावलकर यांची महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड

वालावल गावच्या ग्रामसभेत करण्यात आली. सरपंच श्री राजेश प्रभु यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विकास कामे शासकीय योजना बाबत चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणात सभा झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामाविकस अधिकारी,तलाठी,शिक्षक प्रतिनिधि, आरोग्य सेवक, ग्रामसभा सदस्य उपस्थित होते. यावेळी वालावल गांवची तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य यांची नव्याने निवड झाली राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक आरोग्य तसेच कला क्षेत्रातील गेली 15 वर्ष कुडाळ तालुक्यात तसेच ग्रामपंचायत स्तरावर गावात कायमच पुढे असणारे योगदान आपला वेळ देणार संयमी व गावात सर्वांशी मैत्रीचे आपुलकीचे संबंध जोपासणारे श्री चंद्रकांत वालावलकर यांची निवड करण्यात आली. सण 2013 ते 2016 या कालवधीत पण त्यांना तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम केले वालावल गावचे माजी सरपंच श्री निलेश साळकर यांनी सभेस नाव सुचवलं,याला अनुमोदन श्री रविंद्र गावडे यांनी दिलं सर्वानुमते आभार व्यक्त करण्यात आले सरपंच श्री राजेश प्रभु यांनी शुभेच्छा अभिनंदन करूण समारोप केला