ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे करमळगाळू येथील रस्त्यावर रात्री 8 च्या सुमारास एक भला मोठा लांबीचा अजगर आढळून आला.या मुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.या परिसरात कॅनॉल चा भाग येत असल्याने या कॅनॉल मधून दिवसा तसेच शक्यतो रात्रीच्या वेळी असे सरपटणारे प्राणी बाहेर पडून मुक्त संचार करत असतात अजगर दृष्टीस पडणे यात काही नवे नसले तरी रात्री हे मानवी वस्तीत शिरून पाळीव जनावरे माणसालाही धोकादायक ठरू शकतात.त्यातच या परिसरात जंगल झाडी असल्याने अशा जनावरांच वस्ती स्थान बनले आहे. या परिसरात मानवी वस्तीहीमोठी असल्याने हे प्राणी मानवी वस्तीत शिरण्याचा आणि इजा, जीवित हानी करण्याचा धोका वाढत चालला आहे.













