मडूरा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रीतेश गवंडी बिनविरोध

बांदा (प्रतिनिधी) : मडुरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी प्रितेश गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. मडूरा सरपंच उदय चिंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेत ही निवड जाहीर झाली.

 

मडूरा ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा आरोग्य उपकेंद्राच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली परब, मीरा प्रभू, तलाठी नरेश नाईक, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, पोलीस पाटील नितीन नाईक, उल्हास परब, प्रकाश वालावलकर, निखिल कोरगावकर, दिनेश राऊळ, गिरीश मयेकर, रामदास गवंडी, विजय गवंडी, प्रविण परब, पल्लवी गवंडी, उज्वला परब, पल्लवी परब, अभिषेक राऊळ, तन्वी परब, संतोष परब, नकुल परब, जगन्नाथ परब, लक्ष्मण गवंडी, आनंद पेडणेकर, सोनू शेट्ये, संदीप परब, हेमंत मेस्त्री, सिद्धेश नाईक उपस्थित होते.

 

तंटामुक्त समिती पुढीलप्रमाणे :अध्यक्ष प्रितेश गवंडी, सदस्य सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच कृष्णा गावडे, माजी सैनिक रामदास गवंडी, पदवीधारक दीपक परब, पत्रकार प्रतिनिधी प्रवीण परब, बचतगट प्रतिनिधी प्रतीक्षा शेट्ये, अल्पसंख्यांक प्रतिनिधी फुलोमिना डिसोझा, व्यापारी प्रतिनिधी संदीप परब, मागासवर्गीय प्रतिनिधी श्रीराम जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी भास्कर शेर्लेकर, अनिश परब, युवक प्रतिनिधी केशव परब, संतोष परब, जगन्नाथ परब, नकुळ परब, शशिकांत परब, मुख्याध्यापक मंजिरी झेंडे, बीट अंमलदार बी.एस. पवार, उल्हास परब, ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद ठाकूर, तलाठी नरेश नाईक, पोलीस पाटील नितीन नाईक यांची निवड करण्यात आली.

———