राजापूर पोलिसांकडून गुन्हा दाखल
राजापूर (प्रतिनिधी): मुंबई गोवा महामार्गावर राजापूर एस, टी, डेपोच्या समोरील सार्वजनीक रस्त्यावर चालत असताना वाहनाने धडक दिल्याने राजापुरातील ठेकेदार रविकांत अनंत भामत वय ५९ हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी भामत यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.२५ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
या प्रकरणी रविकांत भामत यांनी राजापूर पोलीसांत फिर्यादी दिली आहे. शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.२५ वाजण्याच्या दरम्यान आपण राजापूर एस, टी, डेपोच्या समोरील सार्वजनीक रस्त्यावर चालत असताना एका चार चाकी हंङाई कंपनीची एक्स्टर गाङी क्रं. एम.एच. ०८ बी.ई. १६२४ या गाडीच्या आज्ञात चालकाने मागून धडक दिली आहे. यात आपल्याला किरकोळ दुखापतही झाली आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीसांनी भामत यांच्या फिर्यादीवरून त्या अज्ञात गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या ताब्यातील चार चाकी वाहन बेदरकारपणे, हयगयीने चालवुन फिर्यादी यांना मागच्या बाजुने ठोकर दिल्याने किरकोळ दुखापत झाली म्हणुन हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.












