माखजन हायस्कुलचे जिल्हास्तरीय स्पर्धेत सुयश

गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व अ‍ॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत,जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी द्वारा आयोजित रत्नागिरी जिल्हा स्क्वॉश संघटना यांच्या तांत्रिक सहकार्याने ,ही जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश क्रिडा स्पर्धा २०२५ झाली. यामध्ये जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेमध्ये विभाग स्तरीयसाठी निवड झाली आहे.

१४ वर्षाखालील गटात सूरज कातकर चौथा.
१७ वर्षाखालील गटात परी विचारे तिसरी,शमिका गोटेकर चौथी
१९ वर्षाखालील गटात तन्वी पकडे प्रथम, जान्हवी गोताड दुसरी,श्रेया फणसे तिसरी,अदिती साळवी चौथी
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,संस्था अध्यक्ष किशोर साठे,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर व अन्य संचालकांनी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षिका क्रांती म्हसकर यांचे अभिनंदन केले आहे.